छत्रपती संभाजीनगर
पैठण वकील संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी ॲड.बागवान तर उपाध्यक्षपदी ॲड. कमलाताई चव्हाण यांची निवड
विलास लाटे | पैठण : दरवर्षीप्रमाणे यंदाही पैठण वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये मागील वर्षीच्या कार्यकारिणी कडून वार्षिक अहवाल सादर करण्यात आला व सन २०२२-२३ साठी नविन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. सर्व वकील सदस्यांनी सभेमध्ये एकमताने अध्यक्ष म्हणुन ॲड. शकील बागवान यांची निवड केली. त्यांच्या कार्यकरिणी मध्ये उपाध्यक्ष म्हणुन ॲड. कमलताई चव्हाण, सचिव म्हणुन ॲड.आर. एस. वाव्हळ, सह-सचिव म्हणुन ॲड. जी. एस.काकडे, कोषाध्यक्ष म्हणुन ॲड. पी. डी. निवारे, तर ग्रंथालय प्रमुख म्हणुन ॲड. एस. बी. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सदरची निवडणूक प्रक्रिया अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली.
या निवड़ी बद्दल सर्व जेष्ठ वकील सदस्य ॲड. कुलकर्णी, ॲड. फटांगड़े, ॲड. विजयकुमार मुळे, ॲड उगले, ॲड. वैद्य, ॲड. निवारे, ॲड. शेवतेकर, ॲड. सय्यद, ॲड. सानप, ॲड. गोरडे, ॲड. संदीप जाधव, ॲड. वाकडे, ॲड. शेख, ॲड. देवगिरे, ॲड. नलावडे, ॲड. वैभव चव्हाण, ॲड. साबू, ॲड. गव्हाणे, ॲड. पहिलवान, ॲड. खड़सन, ॲड जोशी, ॲड. पल्लोड, ॲड. काकडे, ॲड. कडेठानकर, ॲड. डमाळेसह सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.