छत्रपती संभाजीनगर

आपेगाव येथील दोन सख्या बहीणीचा कोरोना योध्दा पुरस्काराने गौरव

विलास लाटे/पैठण : ठाण्यातील पालिकेच्या आरोग्य केंद्रातील कोरोना काळात जिवाची बाजीलावुन काम करणार्‍या दोन सख्या बहिनीना कोरोना योध्दा म्हनुन सन्मानित करण्यात आले आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख वैद्यकिय मदत कक्षाच्या वतिने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे ह्या पैठण तालुक्यातील आपेगावच्या मुळ रहिवासी शिवाजीराव दिवटे यांच्या त्या मुली आहेत. तेजश्री दिवटे व रेशमा दिवटे आशी त्यांची नावे आहेत.

मुंबई महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रावर त्यानी कोरोनाच्या काळात नोकरी केली होती. या कार्यक्रम प्रसंगी नगरविकास मंञी एकनाथ शिंदे, राज्य मंञी बचु भाऊ कडु, संजय राऊत, शिवव्याखाते नितीन बानुगडे पाटील व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी पैठण भागातील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत, मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक तथा अ.भा.छावा संघटना युवक जिल्हाध्यक्ष किरण काळे, पैठण तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर एरंडे, जिल्हा सरचिटणीस संजय मोरे, अभिजीत औटे, अर्जुन खरात, महेंद्र वंजारे, सचिन आंबेकर, रामनाथ बेडके, स्वप्नील चाळक, कृष्णा उघडे, संकेत शिंदे, सुधीर आव्हाड यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button