अहमदनगर

राहुरी महाविद्यालयाजवळील अपघात, आरोपीची निर्दोष मुक्तता

राहुरी / बाळकृष्ण भोसले : राहुरी महाविद्यालयाजवळ राहुरी ते महाविद्यालय रस्त्यावर दिनांक १९ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या अपघातातील आरोपीची नुकतीच राहुरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, राहुरी न्यायालयाचे स्थळ हद्दीत, मौजे, राहुरी या गावाचे शिवारात राहुरी महाविद्यालय ते राहुरी जाणाऱ्या रस्त्यावर पिंजरा हाॅटेल जवळ दि.१९ डिसेंबर २०१७ रोजी रात्री १०.१५ वाजण्याचे सुमारास आरोपी आकाश अनिलकुमार दुबे याने त्याच्या ताब्यातील आय २० ह्युंडाई चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१७ ए. झेड ९५२६ यामध्ये त्यातील फिर्यादी व मयत इसम यांना सदर गाडीत बसवून सदर गाडी ही राहुरी महाविद्यालय ते राहुरी अशी चालवीत घेऊन येत असता, सदर गाडी हयगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकङे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवल्याने सदर गाडी ही रोङच्या कङेस असलेले पुलाच्या कठड्यास धडक बसल्याने त्यात फिर्यादीचे व त्याचे स्वतःचे लहानमोठी दुखापतीस व गाडीचे नुकसानीस तसेच मयताचे मृत्युस कारणीभूत झाला, म्हणुन राहुरी येथील पोलिसांनी आरोपीविरुध्द गु.र.नं.१५०/१८ अन्वये भा.द.वि.कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७, मो.व्हे. ॲक्ट कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला व सदर खटल्याचा तपास करून दोषारोपपत्र राहुरी येथील न्यायालयात दाखल केले. त्यास S.C.C. 470/18 असा क्रमांक पडला.
मा. न्यायमूर्ती एम.पी.मथुरे यांच्या न्यायालयात सदर खटला चालला, साक्षीदार तपासले गेले व मा.न्यायमुर्तींनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश एम. संसारे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button