गुन्हे वार्ता
कृषी अधिकाऱ्यांस खंडणी मागणाऱ्या देवळाली प्रवरातील तोतया पञकारास अटक
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी तालुका कृषी अधिकारी यांना तोतया पञकाराने माहिती अधिकार लावुन वेळोवेळी पैसे मागितले. देवळाली प्रवरा येथिल या तोतया पञकार तथा माहिती अधिकार कार्यकर्त्याला खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यात काही तथाकथित समाजसेवक व तोतया पञकार माहितीचा अधिकार लावून आणि अधिकाऱ्यांना ब्लँकमेलिंग करत असल्याचे प्रकार उघड होत आहे. माञ काही कर्तव्यदक्ष अधिकारी समोर येवून या ब्लँकमेलिंग करणाऱ्यांना चांगला धडा शिकवतात. त्याचाच एक भाग राहुरीत गुरुवारी दिसुन आला आहे.
राहुरीचे तालुका कृषी अधिकारी महेंद्र रघुनाथ ठोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी तालुका कृषी अधिकारी म्हणून जबाबदार पदावर काम करत असताना देवळाली प्रवरा येथिल तोतया पञकार व माहिती अधिकारी कार्यकर्ता इब्राहिम फत्तूभाई शेख माझ्याकडे व कृषी मंडल अधिकारी बाळासाहेब ढगे यांच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करत होता. त्याने रोख स्वरुपात व गुगल प्ले ॲप्लीकेशन द्वारे पैसे घेतलेले आहेत. तसेच दि.14 आँक्टोबर रोजी इब्राहिम शेख याने मला रोख स्वरुपात आर्थिक खंडणी मागून दोन हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
राहुरी पोलीसांनी इब्राहिम शेख याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असुन कृषी कार्यालयात पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा लावून खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडला पुढिल तपास पोलीस उप निरीक्षक मधुकर शिंदे हे करीत आहे.