राष्ट्रीय सेवा योजनेकडून स्वच्छ भारत अभियान…
महाविद्यालयामध्ये स्वयंसेवक आल्यानंतर त्यांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महाजन यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद वाक्य “Not ME But You” माझ्यासाठी नव्हे तरी इतरांसाठी या ब्रीदवाक्याची आठवण करून दिली. आपणास या ब्रीद वाक्यामुळे सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते तसेच शारीरिक कष्टाची जाणीव होत असते आणि व्यायाम देखील होत असतो असे सर्व स्वयंसेवकांना याचे महत्त्व पटवून दिले.
त्यानंतर स्वच्छ भारत अभियान महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता साफसफाई तसेच वृक्षांची छटाई, झाडांना आळे करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. हरिप्रसाद बिडवे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. महाविद्यालयाच्या परिसर स्वच्छ झाल्यानंतर सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे अल्पोपहार देण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.