आरोग्य

वैष्णवी चौक येथे आयोजित लसीकरण मोहिमेत १४७ नागरिकांचे लसीकरण

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत व नगराध्यक्ष सत्यजित पा कदम यांच्या सहकार्याने वैष्णवी चौक येथे आयोजित लसीकरण मोहिमेत जवळपास १४७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले.

लसीकरणास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन उद्या रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी २०२१ रोजी सकाळी १०:०० ते दु. १२:०० वाजेपर्यंत वैष्णवी चौकात पुनश्च कोविशिल्ड लसीचे लसीकरणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ अण्णासाहेब मासाळ, अष्टविनायक क्लिनिकचे डॉ किशोर वाघमारे, डॉ प्रवीण पाखरे, डॉ मोबिन पठाण, डॉ रेखा पंडित, तुळजा मेडीकलचे अक्षय पेरणे, सिस्टर जुलेखा शेख व वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

Related Articles

Back to top button