अहिल्यानगर

मानोरी येथे आदिवासी कुटुंबांना जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका विषयी विशेष मोहीम

मानोरीत राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपसभापती रविंद्र आढाव यांच्या प्रयत्नातुन शिधापत्रिका व जातप्रमाणपत्र विशेष मोहीम राबविण्यात आली.


आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढावराहुरी तालुक्यातील मानोरी हनुमान मंदिर येथे अदिवासी विकास मंत्री तथा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मार्गदर्शनाखाली तसेच राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा गटनेते रवींद्र आढाव यांच्या प्रयत्नाने अनुसूचित जाती जमातीच्या ( आदिवासी ) कुटुंबांना शिधापत्रिका, आधारकार्ड, जातीचे दाखले देणेकामी विशेष मोहीम राबविण्यात आली व चावडी वाचन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अब्बासभाई शेख होते. यावेळी अमोल गुलदगड, डॉ राजेंद्र पोटे, बाळासाहेब वाघ, नवनाथ थोरात, डॉ बाबासाहेब आढाव, सुनिल पोटे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड, गोविंद आढाव, बाबुराव मकासरे, आदिवासी संघटनेचे बाळासाहेब जाधव, एकनाथ बर्डे, विजय माळी, विलास बर्डे, योगेश जाधव, साईनाथ बर्डे, सुरेश शिंदे, सागर जाधव, गोपाळ जाधव आदी आदिवासी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बाबासाहेब आढाव यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी मानले.

Related Articles

Back to top button