महाराष्ट्र
मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार संगमनेर येथील भोर,कोल्हे यांना प्रदान
संगमनेर : सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा 2021 राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्कार अखिल भारतीय क्रांतिसेनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर व दिव्य धारा कंपनीचे सर्वेसर्वा कोल्हेवाडी येथील अमित कोल्हे यांना उद्योगभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे सरपंच सेवा संघांचे राज्याध्यक्ष सन्मा. भाऊसाहेब मरगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सर्वच स्तरातून भोर व कोल्हे यांचे कौतुक होत आहे. पुणे- बंगलोर हायवे भगवती लॉन्स कोल्हापूर येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यभरातून शेती, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता, पर्यावरण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.