आदीवासी समाज बांधवांनी जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधार कार्ड प्रमाणपत्रासाठी ३० सप्टेंबर पुर्वी अर्ज करा
आत्ता पर्यंत संस्थेच्या वतिने जवळपास एक हजार दोनशे आदिवासी नागरिकांचे योग्यती कागदपत्र जमा करण्यात आली असुन आता उर्वरीत सहा दिवसात जास्तीत जास्त अदिवासी बांधवानी तसेच, समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या संघटनानी पुढाकार घेऊन आवश्यक ती कागदपत्र व विहीत नमुन्यातील अर्ज सादर करुन, समाजाची या महत्वाकांक्षी मोहीमेच्या माध्यमातुन शैक्षणिक,राजकीय,सामाजिक आणि अर्थिक प्रगती करण्यासाठी प्रत्येक आदिवासी बंधू-भगिनींनी आपले कागदपत्र स्वताः संबंधित विभागात ३० सप्टेंबर पुर्वी जमा करावेत.
समाजातील काही अशिक्षित गोर- गरीब बांधवाना कागदपत्र जमा करणे शक्य नसल्यास आमच्या संस्थेशी संपर्क करा आम्ही सर्व समाज बांधवास विना मुल्य मदत करु असे आवाहन आदीवासी जमात विकास संस्थेचे अध्यक्ष किरण बर्डे यांच्यासह संतोष दळे, संदिप पवार, संतोष पवार, सुनिल जोगदंड,भाऊसाहेब बर्डे, साईनाथ मोरे, राजु पवार, संतोष नवनाथ पवार, अविनाश पवार, संतोष गायकवाड, सचिन गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, विलास गायकवाड, सतिश बर्डे, ज्ञानेश्वर माळी, भाऊसाहेब दळवे, संजय निकम, गौतम चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.