छत्रपती संभाजीनगर
मुरम्याच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी अरूण फटांगडे यांची निवड
विजय चिडे/ पाचोड : पैठण तालुक्यातील मुरमा ग्रामपंचायत मध्ये दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन करून या सभेमध्ये अरूण रंगनाथ फटांगडे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी ग्रामसभेमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सिंधूबाई दादासाहेब शिंदे या होत्या.
अरूण फटांगडे हे गावात वेळोवेळी गावातील कुठलेही तंटे असो कुठल्याही समस्या असो त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहत असल्यामुळे गावऱ्यांनी यांना बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड केली आहे.
यावेळी ग्रामसेवक मन्सुर शेख,उपसरपंच उषा मापारी, ग्रामपंचायत सदस्य गणेश नेमाणे, गोपिचंद आहेर, जगन्नाथ बाबरे, रोजगार सेवक दिनकर मापारी, पत्रकार विजय चिडे, शाळेय समिती उपध्यक्ष ऋषिकेश काटे, ग्रामंपचायत संगणक चालक शाईनाथ चिडे, ग्रामपंचायत शिपाई राजू भेरे, पोलिस पाटील विश्वनाथ मगरे, रामनाथ फटांगडे, राधाकिसन तिंकाडे, रावसाहेब मगरे, नामदेव फटांगडे, शुभम चिडे, अक्षय लेंभे, उध्दव मगरे, गजानन भोसले, कृष्णा शिंदे, दादासाहेब शिंदे, आप्पासाहेब शिंदे, मुरलीधर निर्मळ, शाईनाथ मापारी, विकास डवणे, परमेश्वर लेंभे, प्रभाकर लेंभे, सनि मापारी, अरूण आहेर आदी उपस्थिती होते.