सामाजिक
माणुसकीचे दर्शन म्हणजेच डॉ.देवगिरे
स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत जवळपास सोळा ते सतरा वर्षापूर्वी डॉ.सतीश देवगिरे यांनी आरोग्य सेवा सुरु करून आजपर्यंत हजारो रुग्णांना नवसंजीवनी देण्याचं काम आजही अविरतपणे सुरु आहे. साधं राहणीमान व उच्च विचार हिच त्यांची खरी ओळख…
कोणताही रुग्ण त्यांच्या दवाखान्यात गेला तर त्याच्याकडे फि चे पैसे असो अथवा नसो त्यांनी कधीच अडवणूक, दुजाभाव केला नाही. उलट त्या रुग्णांना धीर देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन डॉक्टर नेहमीच करत असतात. कोरोनाच्या काळात पेमगिरीतील कोविड सेंटरमध्ये त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विनामूल्य सेवा दिली हीच त्यांच्या माणुसकीची खरी पोचपावती आहे. तसेच कोरोनामुळे मनानं खचलेल्या व घाबरलेल्या रुग्णांना संकटाशी लढण्यासाठी धीर देण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलं त्याची गावात अनेक उदाहरणं आहेत.
डॉक्टर देवगिरे यांचं तसं पेमगिरीशी दोन प्रकारे नातं आहे. एक म्हणजे ते अगोदर डॉक्टर म्हणून तर दुसरं ते पेमगिरीचे जावई आहेत असं दुहेरी नातं चांगल्या प्रकारे जपण्याच काम त्यांनी केलं आहे. आपल्या आरोग्य सेवेत त्यांनी कधीच नियमांची चौकट ओलांडली नाही. इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने कोणताही रुग्ण त्यांच्याकडे गेला तर त्याला योग्य ईलाज व मार्गदर्शन ते नेहमीच करतात.पेशाने ते जरी डॉक्टर असले तरी काळ्या मातीशी त्यांची नाळ आजही घट्ट आहे. त्यांचे गाव धांदरफळ असून दवाखान्याची वेळ संपल्यानंतर ते आपल्या शेतात कसलाही कमीपणा न वाटता शेतातील सर्व कामे या मधल्या वेळेत पूर्ण करून संध्याकाळी पुन्हा पेमगिरीतील दवाखान्यात सेवा देण्यासाठी हजर होतात ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे. आज डॉक्टर सतीश देवगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवंताकडे एकच मागणे मागतो. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा…आजपर्यंत डॉक्टरांनी निस्वार्थी आरोग्य सेवा दिली. इथून पुढेही ती पेमगिरीकरांना नक्कीच मिळेल यात तिळमात्र शंका नाही. डॉ. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
बाळासाहेब भोर
क्रांतीसेना, संगमनेर. मो.9552673745