छत्रपती संभाजीनगर
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
विलास लाटे/पैठण : शिवसेनेचे बालानगरचे दिग्गज कार्यकर्ते भय्याज पठाण उर्फ भंडारी हे आपल्या अनेक कार्यकर्त्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते दत्ताभाऊ गोर्डे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, अप्पासाहेब निर्मळ, गोपीनाना गोर्डे , भगवान गोर्डे, एजाज शेख, आरेफ शेख, बद्रीमामा गोर्डे यांनी अभिनंदन केले.