सामाजिक
पाथरे येथील सौ. पुराणिक नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर रोटरी क्लब मिडटाऊन तर्फे सन 2021 चा नेशन बिल्डर पुरस्कार स्वीकारताना उपक्रमशील शिक्षिका सौ. दिपाली पुराणिक.
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील पाथरे या गावातील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरेगाव या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ. दिपाली राजेंद्र पुराणिक यांना अहमदनगर रोटरी क्लब मिडटाऊन तर्फे सन 2021 चा नेशन बिल्डर पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. न्यायाधीश तथा विधी प्राधिकरण सचिव आर. आर. देशपांडे, रोटरीचे क्षितिज झावरे, ॲड हेमंत कराळे, कल्पना गांधी, किरण कारला मॅडम तसेच सर्व रोटरीचे सदस्य यांच्या उपस्थितीत या पुरस्काराने सौ. दिपाली राजेंद्र पुराणिक यांना सन्मानित करण्यात आले.
सौ पुराणिक यांचा सन २००७ मध्ये गणित प्रदर्शनात तृतीय क्रमांकांबद्दल गौरव करण्यात आला आहे, सन २००७-०८ मध्ये संत रोहिदास महाराज ग्रामविकास प्रतिष्ठानचा सामाजिक पुरस्कार, सन २००८ मध्ये लोकमत सखी मंच जागतिक महिला दिनानिमित्त सखी अवॉर्ड, सन २००९ मध्ये आई प्रतिष्ठान अ.नगर तर्फे आई पुरस्कार, सन २०१०-११ मध्ये कै. ताई घाणेकर पुणे राष्ट्र गौरव पुरस्कार, सन २०११ मध्ये राज्य स्तर नाट्य स्पर्धा दिग्दर्शक पुरस्कार, सन २०१४ मध्ये उषामाई बहुउद्देशीय जनकल्याण संस्था नाशिकचा सामाजिक कार्य पुरस्कार, सन २०२० मध्ये आधार संस्था अहमदनगर तर्फे राज्य स्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार असे अनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित केले आहे. या बद्दल सर्व स्थरातून सौ. दिपाली राजेंद्र पुराणिक यांचे अभिनंदन होत आहे.