छत्रपती संभाजीनगर

पावसाने नुकसान झालेल्या पिकांची तहसीलदार शेळके यांनी केली पाहणी

 

नुकसानग्रस्त सर्व पिकांचे तातडीने पंचनामे केले जातील तहसिलदार शेळके…

विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यात ढगफुटीदृष्य जोरदार पाऊस झाल्याने खरिपातील पिकांचे स्वप्न साकारलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णपणे दि६ ते ७ सप्टेंबर या दोन दिवसात पीक पावसाच्या पाण्याखाली भुईसपाट झाल्याचे चित्र सर्वत्र मराठवाड्यात निर्माण झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी गुरुवार (दि.९) सप्टेंबर रोजी दादेगांव हजारे येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसा पासून जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पैठण तालुक्यातील नांदर मंडळात एकाच रात्री ७४ मिलीमीटर जोरदार पाऊस झाल्याने याचा नांदर सह मोठा फटका दादेगाव बु, खुर्द येथील शेतकऱ्यांना बसला आहे. येथील शेतकरी कल्याण हजारे व रत्नाकर गव्हाणे यांच्या बांधलेल्या विहिरी पूर्ण पणे खचल्याने मोठे नुकसान झाले असून भविष्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. तर दादेगाव ते सावता वस्तीला जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पूर्ण पणे वाहून गेल्याने या वस्ती वरील नागरिकांचा दादेगावशी संपर्क तुटला असल्याने नागरिकांना पायीं रस्ता काढून प्रवास करावा लागत आहे. दादेगाव बु. खुर्द येथील नदी लगतच्या शेतकऱ्यांचे पिक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त पिकाची पाहणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली असून सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे सरपंच मनिषा हजारे यांच्यासह उपस्थित नागरीक, शेतकऱ्यांना सांगितले. तसेच सर्व शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी ॲप चे मार्गदर्शन करून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई ॲप वर नोंदणी लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले आहे.

या वेळी गटविकास अधिकारी के एम बागुल, दादेगाव सरपंच मनिषा अनिल हजारे, सुरेश हजारे, महादेव हजारे, उद्धव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, आबासाहेब हजारे, अविनाश हजारे, संतोष हजारे, बद्री हजारे, देविदास हजारे, संपत झिने, दत्ता बारे, सुनील हजारे, ज्ञानेश्वर हजारे, शिवनाथ हजारे, नामदेव गहाळ, अशोक भुकेले, प्रल्हाद गहाळ, भाऊसाहेब हजारे, सुदर्शन हजारे, नारायण हजारे, गणेश गहाळ, अरुण काकडे, नरहरी हजारे, अतुल हजारे, कैलास आढाव, महेश मुंदडा, मनोज डेंगळे, मंडळ कृषी अधिकारी सुहास धस, कनिष्ठ अभियंता सचिन सोमवंशी, कृषी सहायक सचिन निवारे, सोमनाथ औटे, ऋषीकेश ढवळे, किरण कुमार भादले, राम हजारे, अरुण भुकेले, भागवत हजारे, बंटी हजारे, राजू हजारे, अर्जून गहाळ, विजय झीने, भागचंद वाघ, ज्ञानदेव उघडे, विष्णू हजारे, काकासाहेब हजारे, मनोज हजारे आदी नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button