अहिल्यानगर

बाबा अमरनाथ यात्रा पूर्ण करून घरी सुखरूप परल्यानंतर निवेदक ढोकणे यांचा सन्मान

राहुरी – येथील बिरोबा नगर येथे अ.नगर जिल्ह्यातील आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना भुरळ पाडणारे निवेदक व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे हे दिव्यांगावर मात करून बाबा अमरनाथ व वैष्णवी देवी यात्रा पूर्ण करून सुखरूप घरी परतल्याने तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अगदी खरोखर सदृढ व्यक्तीलाही अवघड जाणारी अमरनाथ यात्रा करत असताना तिथे ढगफुटी झाली,  त्यामध्ये बरेच भाविक वाहून गेले. त्यामधून, आपण मोठ्या पराकाष्टाने जिद्द आणी मनाच्या एकाग्रतेची वज्र मूठ बांधून येणार्या सर्वच संकटांवर मात करुन देव देवतांच्या आशीर्वादाने यात्रा सुखरूप पार पाडली. आप्पासाहेब यांचे अनुभव ऐकून मन गहिवरुन आले. एक फुल नाही पण तुम्हासोबत फुलाच्या पाकळीतील कणभर तरी पुण्य आम्हा सर्वांना आपल्या चरणाशी लाभावे अशी परमेश्वराकडे सदिच्छा. कार्यक्रमानिमित्त नवीन उपक्रमांना सुरूवात केली. त्यात “चला व्यवसाय उभारू दिव्यांगा चे” या उपक्रमांतर्गत दिव्यांग असणारी कविताताई सुर्यवंशी यांना भाजीपाला व्यवसाय करायची इच्छा आहे. परंतु तिला व्यवसाय करण्यासाठी हातगाडी चि गरज होती. तात्काळ प्रहार च्या पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याचे जाहीर केले व लवकरच भाजीपाला व्यवसायासाठी हातगाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष मधुकरराव घाडगे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, सचिव योगेश लबडे, तालुका संपर्कप्रमुख रविंद्र भुजाडी, राहुरी तालुका सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सलीमभाई शेख, टाकळीमिया शाखाध्यक्ष नानसाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दानवे, माहेगाव शाखाध्यक्ष भारत आढाव, गोटुंबा आखाडा शाखाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, राहुरी शहर महीलाध्यक्ष अनामिका हरेल, सदस्य कविता सुर्यवंशी आदी पदधिकारी उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button