धार्मिक

हिरडगावात नागनाथ महाराजांचा ४२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

श्रीगोंदा | सुभाष दरेकर : तालुक्यातील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या हिरडगावात, पुरातन काळापासून पुर्वमुखी पिंड असलेले श्री नागनाथ महाराज मंदिर हे श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. गावातील ही परंपरा जपत यावर्षी ४२ वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांनी हरिनामाच्या गजरात समाजप्रबोधनाची अमृतधारा गावकऱ्यांपर्यंत पोहोचवली. सप्ताहाचा समारोप पारनेरचे सुप्रसिद्ध कीर्तनकार एकनाथ महाराज चतर शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “आजवर माझ्या कार्यकाळात गावासाठी भरपूर निधी दिला असून, पुढेही कोणतीही कमतरता भासू देणार नाही. नागनाथ महाराज हे सत्वाचे प्रतीक असून, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात.” तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

या भव्य सोहळ्याचे नियोजन हिरडगाव ग्रामस्थ व श्री नागनाथ महाराज विश्वस्त मंडळ यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केले. गावातील नागरिक, परगावी स्थायिक झालेल्या मुली तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सप्ताहाला प्रतिसाद दिला.

हरिनामाच्या गजरात संपन्न झालेला हा आठवडाभराचा आध्यात्मिक उत्सव, गावकऱ्यांच्या एकतेचे आणि भक्तीभावाचे सुंदर उदाहरण ठरला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button