धार्मिक

हरेगाव मतमाउली भक्तिस्थान येथे उपवास काळास प्रारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा मतमाउली भक्तिस्थान हरेगाव येथे बुधवार, ५ मार्च २०२५ पासून २० एप्रिल पर्यंत अध्यात्मिक नियोजन केले आहे. प्रत्येक बुधवार व शुक्रवार या दिवशी पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती व उपासनाविधी नियोजन आहे. राखेच्या बुधवार निमित्त पवित्र विधिव्दारे ५ मार्च २५ रोजी भाविकांच्या कपाळाला भस्म लेपन करून मानवा तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळणार आहेस, याचे स्मरण करून त्याच बरोबर पश्चाताप करा व परमेश्वर वचनावर विश्वास ठेवा. या अनुषंगाने येणारे चाळीस दिवस भाविकांनी प्रामुख्याने १८ ते ६० वयोगटातील सर्व भाविकांनी उपवास, प्रार्थना, दानधर्म आणि विशेषकरून मासवर्ज्य करण्यास सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

या उपवास काळामध्ये प्रामुख्याने राखेचा बुधवार आणि उत्तम शुक्रवार [गुड फ्रायडे] हे दोन दिवस सर्वांसाठी कडक उपासाचे आणि सक्तीचे असतील याचे विवेचन प्रमुख धर्मगुरू रे फा. डॉमनिक रोझारिओ यांनी सर्व भाविकांना केले आहे आणि या उपवास काळामध्ये विविध धार्मिक तप विभागीय हरेगावमधील जे विभाग आहेत, त्या ठिकाणी त्याच बरोबर खेडेगावात देखील प्रापंचिक मिशनरी तसेच सर्व धर्मगुरू ठिकठिकाणी जाऊन धार्मिक प्रबोधन करीत आहेत व यापुढे करीत राहणार आहेत.

त्याचप्रमाणे शुक्रवार दि. ११ एप्रिल ते १३ एप्रिल या दिवसात तपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी फा.अँडरू जाधव हे प्रवचनकार असतील. या पूर्ण ४० दिवसाचे नियोजन योग्य प्रकारे केले आहे. यामध्ये भाविक विशेषकरून या दिवसात जो त्याग करणार आहेत व त्याच्या त्यागाचे प्रतिफळ म्हणजे प्रामुख्याने आपल्या दररोजच्या जीवनामधून जे काही आर्थिक बाब आहे. ते देवाला समर्पित करण्यासाठी व पूर्ण ४० दिवसात त्याग केलेले आहे. ते दान कॅथोलिक डायसीस ऑफ नासिक येथे महागुरुस्वामी रा रे डॉ बार्थोल बरेटो यांचेकडे सुपूर्त करण्यात येईल व सर्व दान महागुरुस्वामी ते रोम या ठिकाणी पाठवणार आहेत. याचा सदुपयोग सर्व गरीब जनतेसाठी करण्यात येणार असल्याचे हरेगाव येथील प्रमुख धर्मगुरू रे फा डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले. सर्व धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button