कृषी

आदिवासी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी अवजारांचे वाटप

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाच्या वतीने मौजे निंबोणी, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे आदिवासी शेतकऱ्यांना चारा पिकांचे बियाणे व कृषी अवजारे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप लांडगे, नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आदित्य देशपांडे, तसेच चारा पिके प्रकल्पातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक दीपक पालवे उपस्थित होते.

या कार्यक्रमात चारा पिके संशोधन प्रकल्पाच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत प्राप्त अनुदानाचा उपयोग करून रब्बी हंगामासाठी ओट व बरसिम या चारा पिकांचे बियाणे, मनुष्यचलित सायकल कोळपे आणि कृषिदर्शिका यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी निंबोणी व श्रावणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक सुहास भालेराव, अरुण कदम, योगेश पाडवी तसेच प्रगतिशील शेतकरी आणि लाभार्थी असे एकूण 30 आदिवासी शेतकरी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button