अहिल्यानगर
मुळापाटबंधारे विभागाच्या सायली पाटील व आंधळे यांचा वृक्ष देवुन सत्कार
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : मुळानगर येथील वसाहतीमध्ये कायमच पाण्याची गैरसोय होत होती. तरी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून मुळानगर वसाहतीसाठी असलेली पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारे सर्व साहित्य दिले. यावेळी त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करतांना भाजपा आदिवासी तालुका अध्यक्ष अंकुश बर्डे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस मयूर गवळी, आर पि आय अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शायबाज शेख, आसाराम माळी, युवा नेते चाँदभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.