शिक्षणवारी ज्ञान पंढरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसीय “बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान” विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. 6 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.

या प्रशिक्षणात ब्रेड, नानकटाई, नाचणी (नागली) बिस्किट, बन पाव, लादी पाव, टोस्ट, सुरती (जीरा) बटर, कप केक या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय बेकरी व्यवसाय सुरू करण्याच्या पद्धती, अन्न व सुरक्षितता मानके, संबंधित कायदे, बेकरी उद्योगाची नोंदणी, आवश्यक मशिनरी व त्यांची देखभाल, बेकरी पदार्थांचे पॅकेजिंग व मार्केटिंग, शासनाच्या कर्ज योजना, बेकरी उद्योगातील अडचणी व उपाययोजना, तसेच बेकरी उद्योगाचे व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाईल.

प्रशिक्षण वेळ आणि ठिकाण:

ठिकाण: बेकरी युनिट, मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00

प्रवेश मर्यादा: 25 प्रशिक्षणार्थी

नोंदणी शुल्क: रु. 4500/-

या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणार्या प्रशिक्षणार्थींनी त्यांचे शुल्क “लेखा व अधिदान अधिकारी, मफुकृवि, राहुरी” यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खाते क्रमांक 38817479754 (IFSC Code: SBIN0003239) यावर जमा करावे. शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉट श्रीमती सविता धनवडे (मोबाईल क्रमांक: 9421187540) यांना पाठवावा. अधिक माहितीसाठी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांच्याशी संपर्क साधावा.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button