सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुल दिंडीचे उंदीरगाव येथे भव्य स्वागत
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल बाभळेश्वर विद्यार्थी दिंडीचे श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. मा. चेअरमन सुरेश पाटील गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे तसेच गावातील ग्रामस्थ व मान्यवर यांनी दिंडीचे स्वागत केले. दिंडीत सहभागी होऊन उपस्थितांनी हनुमान मंदिरापर्यंत सहभाग घेतला.
दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी सुरेश पाटील गलांडे यांनी नाश्त्याची तर राजेंद्र पाउलबुद्धे यांनी बिस्किटे आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या. प्रारंभी हनुमान चालीसाचे वाचन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज डमाळे यांच्या हस्ते चेअरमन सुरेश पाटील गलांडे व राजेंद्र पाउलबुद्धे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने दिंडी प्रमुखांचा विशेष सत्कार झाला. दिंडी प्रमुख ह.भ.प. भगवान महाराज डमाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सुसंस्कृत व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असलेले सुरेश पाटील गलांडे यांनी आज दिंडीत सहभागी मुलांना रस्सा वडा पाव, जिलेबी यांसारख्या पदार्थांचा भरपेट नाश्ता दिला. त्यांचे दातृत्व आणि अन्नदानाची परंपरा कौतुकास्पद आहे. गंगागिरी महाराजांच्या “लेनेको हरीनाम, देनेको अन्नदान” या तत्त्वाचे पालन गलांडे कुटुंबीय करत असल्याचेही डमाळे महाराजांनी नमूद केले. अशा सेवाकार्यामुळे अन्नदान हे श्रेष्ठदान ठरते, असेही त्यांनी सांगितले.
गलांडे यांच्या वडिलांनी वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या पंगतीची परंपरा अखंड ठेवण्याचे सांगितले होते. आजही ही परंपरा तितक्याच तळमळीने सुरू आहे. शिरसगावचे माजी पोलीस पाटील सोपानराव गवारे यांच्या माध्यमातून गलांडे यांची भेट झाली. त्यावेळी काळजी करण्याचे कारण नाही असे गवारे म्हणाले. उंदीरगावच्या बाबतीत याशिवाय २०० फिरते शौचालय साफ करण्याची जबाबदारी या गावाने अनेकदा घेतली होती. उंदीरगावमधील स्वागतानंतर दिंडी माळेवाडी येथे मुक्कामी थांबली. त्यानंतर श्रीक्षेत्र गोदावरी धाम येथे सद्गुरू गंगागीरी महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहासाठी दिंडीचे प्रस्थान झाले.
या सोहळ्यात ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के, सुरेश पाटील गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे, राजेंद्र गिर्हे, वीरेश गलांडे, सुभाष चोरडिया, जितेंद्र गोलवड, बाळासाहेब निपुंगे, अशोक गलांडे, बाळासाहेब आढाव, सोपान नाईक, सतीश नाईक, सुरेश शिंदे, सोपानराव गवारे, मच्छिंद्र आढाव, बाळासाहेब पडोळे, भाऊसाहेब चोरमल, नारायण बडाख, गेनुबाबा भालदंड, बाळासाहेब राऊत, विजय गिर्हे आदी मान्यवर उपस्थित होते. दिंडी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.