आरोग्य

अनेकांनी घेतला नाडी परीक्षणाचा लाभ 

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक व त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नाडी परीक्षण व अष्टविद परीक्षेसह या शिबिरात आज शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

या शिबिरात आयुर्वेदाचार्य डॉ. सोनाली खर्डे व डॉ. प्रीतम गोरडे यांनी पेशंटची नाडी परीक्षण करून मार्गदर्शन व आहार विषयक सल्ला मार्गदर्शन व उपचार दिले. सदर शिबिर यशस्वीरित्या पार करण्याकरता श्री आयुर्वेद हर्बल कॉस्मेटिकच्या संचालिका सौ. सोनल त्र्यंबके व संदीप त्र्यंबके त्याचबरोबर महादेव ओहोळ व सुभाष कुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिकच्या संजयलिका सौ सोनल संदीप त्र्यंबके यांनी सांगितले की, वेळोवेळी आमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे उपयोगी अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. त्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना नक्कीच फायदा होईल. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणे व येणाऱ्या काळामध्ये संस्कारशम्यं व निरोगी सुदृढ पिढी घडवणे हेच आमचे ध्येय असेल. त्यासाठी श्री आयुर्वेद व हरबल कॉस्मेटिकच्या माध्यमातून अनेक उपक्रम आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी राबवत राहील.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button