भाऊसाहेब कांबळे यांना शेतकरी प्रश्नांवर जाहीर पाठिंबा- जिल्हाध्यक्ष अनिल औताडे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन शेतकरी प्रश्नांबाबत शिंदे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव, शेतमालाच्या हमीभावासह विविध शेतकरी प्रश्नांवर पाठिंबा दिलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व श्रीरामपूर या दोन्ही मतदार संघात एकनाथ शिंदे यांचे काम बघून ते नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील या अनुषंगाने शिंदे सेनेच्या मित्र पक्षांचा विचार बाजूला ठेवून शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे. तरी मतदार संघातील शेतकरी बंधू-भगिनींनी भाऊसाहेब कांबळे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ॲड. काळे यांनी केली आहे.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, शिंदे सेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रुपेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, शिंदे सेनेचे तालुका अध्यक्ष डॉ. संजय फरगडे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, डॉ. विकास नवले, ॲड. घोडे, ॲड. प्रशांत कापसे, गोविंदराव वाघ, शरद असणे, संदीप उघडे, सागर गिऱ्हे, प्रदीप वारुळे उपस्थित होते.
तरी दूध, आकारिक पडीत, कर्जमाफी, वीज प्रश्नावर शेतकरी संघटनेने ॲड. अजित काळे यांच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. भविष्यातही सदर प्रश्नांत लक्ष घालण्यासाठी आपल्या प्रश्नाची जाण असलेले उमेदवार विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील विठ्ठलराव लंघे व श्रीरामपूर तालुक्यातील भाऊसाहेब कांबळे हे शेतकरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असणार असल्याचा विश्वास ॲड. काळे यांनी व्यक्त केला.
तसेच श्रीरामपूर मतदारसंघातील भाऊसाहेब कांबळे हे तालुक्यातील भूमिपुत्र असून त्यांना तालुक्यातील बऱ्याच प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे एक शांत, संयमी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व जातीय सलोखा राखणारे व्यक्तिमत्व असल्याचे आपणास मागील दोन वेळा त्यांना आमदार करून अनुभव आला आहे. तरी शेतकरी संघटनेचे व शिंदे सेनेचे हात बळकट करण्यासाठी भाऊसाहेब कांबळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावी असे आव्हान श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष युवराज जगताप व राहुरी तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे यांनी केले आहे.