राजकीय

अक्षय कर्डिले यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे राहुरी मतदारसंघात भाजपला अनुकूल परिस्थिती !

युवा वर्गाचे मोठे संघटन ठरणार निर्णायक...

राहुरी | अक्षय करपे : राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराला वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत कर्डिलेंसाठी त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी मोठी जबाबदारी स्वीकारून गाठीभेटी वाढवल्या आहेत. मागील काही काळात अक्षय कर्डिले यांनी युवकांचे मोठे संघटन निर्माण करीत मतदारसंघात चांगली मोर्चेबांधणी केली आहे. त्याचा मोठा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यंदाच्या निवडणुकीत चांगलेच सक्रिय झाले आहेत. वडिलांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेताना त्यांनी युवा वर्गात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मतदारसंघातील राहुरी तालुक्यासह नगर तालुका, पाथर्डी तालुक्यात त्यांनी मागील सहा महिन्यांपासून दौरे करून युवकांची फळी उभी केली आहे. स्वतः शिवाजीराव कर्डिले प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना अक्षय कर्डिले यांनी विविध घटकांशी संवाद साधत प्रचारयंत्रणा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सक्रिय केली आहे. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी मतदार जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

राहुरी येथे अक्षय कर्डिले यांनी केलेल्या भाषणाचीही चर्चा होत आहे. वडिलांनी कायम जनतेसाठी वेळ दिला. मी २८ वर्षांचा झालोय. पण या काळात वडील नेहमीच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी सक्रिय आहेत. प्रसंगी कुटुंबियांना वेळ न देता वडील जनतेसाठी आपला वेळ खर्च करतात. आजही हीच जनसेवा त्यांनी कायम राखली आहे. कर्डिले कुटुंबावर जनतेने नेहमीच आपले प्रेम आणि विश्वास दाखवून दिला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काही कारणांनी पराभव झाला असला तरी आता जनताच परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे, असे अक्षय कर्डिले सांगतात.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button