शिवाजीराव कर्डिले परिवारातर्फे फराळ कार्यक्रम उत्साहात साजरा
राहुरी : शिवाजीराव कर्डिले यांनी सालाबाद प्रमाणे आपल्या कर्डिले मळा निवासस्थानी नगर जिल्ह्यातील विविध मान्यवर, जिव्हाळ्याची आपुलकीची माणसे तसेच स्थानिक पातळीवरील जीवाभावाचे अनेक सहकारी लाडक्या बहिणीसाठी फराळाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले आहे की, मी गेल्या 30 वर्षापासून नगर जिल्ह्यातील माझ्या प्रेमाच्या नागरिकांसाठी फराळाचे आयोजन करत असतो याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मला नगर जिल्ह्यातील जनतेने पाच वेळेस आमदार केले, मंत्री केले, जिल्हा बँकेचे चेअरमन केले, मग माझेही दायित्व आहे की त्यांच्या प्रेमाला उतराई होण्यासाठी मी दरवर्षी पाडव्याच्या दिवशी फराळाचे आयोजन करत असतो.
गेल्या 30 वर्षापासून फराळाचे आयोजन करत असताना माझ्या निवासस्थानी हजारो नागरिक दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात याचा आणि राजकारणाचा काडीमात्र संबंध नाही आणि राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नगर जिल्ह्यातील जनतेचे व माझे कौटुंबिक संबंध आहे आणि प्रेमाचा जिव्हाळा आहे आणि तो वर्षानुवर्ष टिकवुन रहावा यासाठी मी पाडव्याच्या दिवशी फराळाचे आयोजन करत असतो असे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले आहे.
दरम्यान माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले नगर जिल्ह्यातील त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यातले करून घेतात हे त्यांची खासियत आहे. तसेच त्यांच्याकडील होणाऱ्या कार्यक्रमाला ते आपल्या जिवाभावाची माणसे सहकारी व त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य मित्र परिवाराला आमंत्रित करून आदरतिथ्य करत असतात. याही वर्षी त्यांनी पाडव्याच्या दिवशी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमाला सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. फराळ कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांशी स्नेहसंवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.