तांत्रिक कारणामुळे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांची राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातून माघार
राजूभाऊ शेटे यांच्या युवा संकल्प मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित
राहुरी : तालुक्यातील लाडके सामाजिक नेतृत्व राजूभाऊ शेटे यांनी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांनी राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती वृत्त असे की राहुरी पाथर्डी नगर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील निवडणूक लढविण्याच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घ्यायचा यासाठी राहुरी येथील विठ्ठला लॉन्स मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान आयोजित युवा संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे आपला निर्णय स्पष्ट करणार असल्याने सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांना मानणारा राहुरी पाथर्डी नगर तसेच आसपासच्या मतदारसंघातूनही मोठ्या संख्येने युवक शेतकरी कष्टकरी कामगार बेरोजगार तरुण समाजातील सर्व वर्गातील नागरिकांची उपस्थिती या मेळाव्यामध्ये दिसत होती. यावेळी तालुक्यातील सर्वांनी तालुक्यातील परिस्थितीबाबत तालुक्याला राजूभाऊ शेटे यांचे नेतृत्वाची गरज असल्याची तीव्र भावना आपल्या भाषेतून बोलून दाखविली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान आयोजित युवा संकल्प मेळाव्याला संबोधित करताना म्हटले आहे की माझ्या एका हाकेवर माझ्यावर प्रेम करणारा युवक शेतकरी कामगार शोषित वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित झाला. यातच माझा विजय आज निश्चित झालेला आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला ही निवडणूक लढविता येणार नसल्याने यापुढे आपण एखाद्या चांगल्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करून तालुक्यातील विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
तसेच आपण निवडणूक कशासाठी लढणार होतो हे आधी स्पष्ट करणे गरजेचे होते तर तालुक्यातील मुळा प्रवरा, सुतगिरणी, राहुरी कारखाना, मुळा डॅम, विद्यापीठ मधील तालुक्यातील तरुणांना रोजगार, नगर मनमाड रस्त्याची दुर्दशा या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण निवडणूक लढणार होतो. कारण या सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे करणाऱ्यांना या निवडणुकीतून आपल्याला धडा शिकविणे महत्त्वाचे होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला ही निवडणूक लढवता येत नसल्याने पुढील काळामध्ये आपले हे सर्व प्रश्न नक्कीच मार्गी लावणार आहोत तसेच आपल्याला आता एखांदा राजकीय पक्षात प्रवेश करणे गरजेचे असल्याने यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अथवा शिवसेना शिंदे गट हे दोन पर्याय आपल्यापुढे असून याचा विचार करून येत्या काही दिवसांमध्ये आपण पक्ष प्रवेश करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ शेटे यांनी सांगितले आहे.
दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान आयोजित युवा संकल्प मेळाव्यासाठी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून तसेच सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांच्यावर प्रेम करणाऱ्या इतर मतदारसंघातील हजारो तरुणांनी या मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवली तसेच तालुक्यातून हजारोंच्या संख्येने अफाट संख्येने युवक शेतकरी व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व घटकातील समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने अफाट गर्दी जमली होती. अशाप्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान आयोजित विराट युवा संकल्प मेळावा उत्साहात पार पडला.