राजकीय

हिरडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दरेकर

श्रीगोंदा | सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद हे माजी उपसरपंच चिमाजी आप्पा दरेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाले होते. त्यामुळे आज तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या हिरडगाव ग्रामपंचायतीची उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कै. झुबरराव दरेकर यांच्या पॅनेलचे अमोल दरेकर हे विजयी झाले. ही निवडणूक सरपंच दिपाली नानासाहेब दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयश्री भानुसे मॅडम यांनी काम पाहिले.

अमोल दरेकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल गौरी शुगरचे मॅनेजर श्री. यादव, भाजपचे नेते मिलिंद दरेकर, युवा नेते संतोष दरेकर, संपतराव दरेकर, दत्तात्रय दरेकर, काष्टी सोसायटी माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ, व्हा. चेअरमन कैलास दरेकर, माजी व्हा. चेअरमन देवराव मोरे, संचालक नवनाथ गुणवरे, कांतीलाल भुजबळ, विजय भुजबळ, लक्ष्मण दरेकर, सौ. मंगल दरेकर, सौ. शोभा दरेकर, सौ. विद्याताई ढवळे, ज्ञानदेव दरेकर, सुनिल भुजबळ, देविचंद भुजबळ, मा संचालक पोपटराव ढवळे, चेअरमन मनोहर दरेकर, संभाजी दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, आप्पा दरेकर, अमोल दरेकर, सचिन बेद्रे व उपसरपंच चिमाजी आप्पा दरेकर व सर्व सदस्य ग्रामपंचायत हिरडगाव यांनी अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button