सामाजिक

डॉ. माळवे यांना जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खंडू माळवे उर्फ डॉ खं र माळवे – खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक सुकृत खांडेकर यांचे हस्ते नुकताच देण्यात आला.

ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भूषविले. कार्यक्रम उद्घाटन प्रसिध्द साहित्यिक पत्रकार डॉ खं र माळवे यांचे हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी पद्मश्री डॉ. डी जी यादव, डॉ रेसिक एंजल्स, दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, भानुदास केसरे, प्रमोद महाडिक, रामकृष्ण कोळवणकर, राजेश कांबळे, डॉ. गॅन्सी अल्बुकर्क यांची भाषणे झाली. यावेळी निवोदित कविंच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात साहित्यिक संपादकीय वैद्यकीय कला नाट्य नवोदित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना, पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी पी बी ई सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड व्हिजन संस्था प्रा नागेश हुलवळे, लेखक रमेश पाटील, प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button