अहिल्यानगर
ॲड. भोंगळ यांची भारत सरकार पब्लिक नोटरीपदी नियुक्ती

राहुरी | अशोक मंडलिक : केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने राहुरी न्यायालयातील विधीतज्ञ ॲड. संदिप नानासाहेब भोंगळ यांची नोटरी पब्लिकपदी निवड करण्यात आली आहे.
ॲड. संदिप भोंगळ हे राहुरी न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. विविध बँका, वित्तिय संस्था, सामाजिक संघटना यावर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असताना काल विधी व न्याय मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे ॲड. भोंगळ यांची भारत सरकार पब्लिक नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.