धार्मिक

श्री खंडेराय यात्रा उत्सव कमिटीची बैठक संपन्न

अध्यक्षपदी खैरे, उपाध्यक्षपदी वराळे, तोडमल यांच्या निवडी

राहुरी : शहरातील शनी मंदिर येथे ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मार्तंड देवस्थान ट्रस्ट संचलित श्री खंडेराय यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी गणेश खैरे तर उपाध्यक्षपदी दादासाहेब तोडमल व कांतीराम वराळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यात्रा कमिटीची बैठक शुक्रवार, दि. 8 मार्च रोजी शनी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते संभाजीराजे तनपुरे हे होते. श्री खंडेराय यात्रा उत्सव 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत सुरू राहणार असून सर्व भाविकांनी यात्रा उत्सवाचा लाभ घेण्याचे आव्हान यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

या यात्रा उत्सव कमिटीच्या सचिव पदी अक्षय वराळे, उपसचिवपदी वरून तनपुरे, खजिनदारपदी अण्णासाहेब तनपुरे, उपखजिनदार राजेंद्र शेळके यांची निवड करण्यात आली असून हंगामा (कुस्ती) कमिटीच्या अध्यक्षपदी नयन शिंगी, उपाध्यक्ष राजेंद्र वाडेकर, रंगनाथ तनपुरे, राजेंद्र म्हसे, शिवाजीराव वराळे, दत्तात्रय येवले, संजय नांदे, संदीप वराळे, सोन्याबापू जगधने, नारायण धोंगडे, सुनील पवार, श्रेयस रासने, विशाल शेजुळ, अजित डावखर यांची कमिटीच्या वतीने निवड करण्यात आली.

यावेळी बैठकीला सदाशिव शेळके, रामदास बोरुडे, प्रभाकर म्हसे, सचिन भुजाडी, चंद्रकांत उंडे, अशोक वामन, सुभाष वराळे, अमोल तनपुरे, अमोल उंडे, कांतीराम वराळे, हरिभाऊ उंडे, आकाश येवले, अतिक बागवान, नानासाहेब गुंजाळ, राजेंद्र ठोकळे, अजित डावखर, संदीप तमनर, विठ्ठल तमनर, शरद येवले आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 दिवस चालणाऱ्या यात्रेचे स्वरूप

28 एप्रिल रोजी सकाळी पाच वा. अभिषेक, 8 वा. कावड मिरवणूक, सायंकाळी 5.30 वा. बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, रात्री शोभेची दारू.

29 एप्रिल रोजी 9 वा. हजेर्या, दुपारी 4 वा हंगामा (कुस्ती).

30 एप्रिल रोजी महिलांसाठी राहाडगाडगे, दुपारी बैलगाडी शर्यत‌.

1 मे रोजी सकाळी नऊ ते बारा यात्रा कार्यक्रमातील देणगी वाटप.

2 मे रोजी महिलांसाठी राहाडगाडगे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button