अहिल्यानगर
बी.आर. चेडे यांना पुणे प्रवाहरत्न युवा आदर्श पत्रकार पुरस्कार
श्रीरामपूर : जेष्ठ पत्रकार बी.आर. चेडे हे ४८ वर्षांपासून तसेच वयाच्या ७४ व्या वर्षीही पत्रकारिता क्षेत्रात अविरत उत्कृष्ट कार्य करीत असल्याने “पुणे प्रवाहरत्न २०२४ युवा आदर्श पत्रकार” या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
आज पुणे प्रवाह न्यूजच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीरामपूर येथील राधिका हॉटेल सभागृहात पार पडलेल्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात संपादक संतोष सागवेकर यांच्या हस्ते या पुरस्काराने पत्रकार बी.आर. चेडे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील संदीप वेताळ, बापू गायकवाड, तसेच भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जना जागृती महासंघ पहिल्या अधिवेशन प्रसंगी उपस्थित मान्यवर उपस्थित होते. बी.आर. चेडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.