भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीच्या अध्यक्षपदी पवार
देवळाली प्रवरा : भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी दादासाहेब कुशाबापू पवार यांची निवड करण्यात आली असुन हि निवड कोलकता येथिल भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर जयस्वाल यांनी नुकतीच जाहिर केली आहे.
कोलकता येथिल भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीच्या वतीने राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल दादासाहेब कुशाबापू पवार यांची निवड करण्यात आली आहे. भ्रष्टचार विरोधी न्याय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर जयस्वाल यांनी नुकतेच पञाद्वारे निवड झाल्याचे कळविले आहे.
दादासाहेब पवार यांनी भ्रष्टाचार विरोधाची लढाई अनेक वर्षांपासुन सुरु केली आहे. निळवंडे साठी त्यांनी अनेकवेळा उपोषण केले. अहमदनगर व मुंबई मोटार सायकल रॅली सहभाग, व्यसनमुक्ती मध्ये महाराष्ट्रात गुटखाबंदी व्हावी म्हणून याचिका दाखल, त्यानंतर उच्च न्यायालयाचे गुटखाबंदीसाठी महाराष्ट्र शासनाला आदेश देण्यात आले आहेत. राहुरी सूतगिरणी कामगार यांचे रखडलेली वेतन मिळवून देणे कामे उपोषण व आंदोलन केले.
गोरक्षणासाठी विविध पोलीस ठाण्यात अनेक जणांवर गुन्हे दाखल केले. गौरक्षण करणे व भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक शासकीय अधिकाऱ्यांविरोधात शासनाकडे तक्रारी दाखल केल्या. चौकशी होवून हि शासनाने कारवाई न केल्यास उच्च न्यायालय तसेच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन अनेक शासकीय अधिकाऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाला परत भरण्यास भाग पाडले. वाळू तस्करी विषयी उच्च न्यायालयात तक्रारी दाखल करून त्यावर उच्च न्यायालय यांनी कोट्यावधीचा दंड वसुली करण्यासाठी शासनाला आदेश दिले आहेत.
पवार यांनी सामाजिक कामांमध्ये सहभाग घेवून अनेक गरीब लोकांचे शासकीय ठिकाणी अडकलेले कामे मार्गी लावण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. पवार यांच्या सामाजिक कामांची दखल घेत कोलकता येथिल भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर जयस्वाल यांनी दखल घेवून भ्रष्टाचार विरोधी न्याय समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.