फुले दांम्पत्यावर आधारित सत्यशोधक चित्रपट सर्वांनी बघावा – महाराष्ट्र भूषण सचिन गुलदगड
नगर – सावित्रीमाई फुलेंच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दि. ५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रभर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षशील जीवन चरित्रावर आधारित “सत्यशोधक” हा मराठी चित्रपट प्रसारित होत आहे.
चित्रपट इंडस्ट्रीतील कटकटीतून मार्ग काढत निर्माता दिग्दर्शक यांनी अथक मेहनतीने हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचला आहे. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी हे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची भूमिका साकारत आहेत. तसेच इंटरनॅशनल पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे हेच माई सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत, तसेच सैराट फेम सुरेश विश्वकर्मा हे क्रांतिवीर उस्ताद लहुजी साळवे यांची उत्कृष्ट भूमिका साकारत आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे चारित्र्य वाचण्यासाठी सध्या तरी कोणालाही वेळ मिळत नाही. त्यांनी आपल्या जीवनात किती कष्ट सहन केले आहे त्यांची पावलोपावली त्याकाळी विटंबना केली, छळ झाला तरी सुद्धा त्यांनी आपलं ध्येय धोरण सोडले नाही व स्त्री शिक्षणाची पायाभरणी करत आज महिलांना उंचावर नेत गगन कमी पडत आहे हे त्यांचे त्याग व धाडस कधी पुस्तकातून कोणीच वाचले नाही. परंतु आता त्यांचा जीवनपट पडद्यावर बघण्याची संधी आपणास सर्वांना चालून आली आहे.
शहरासह खेड्या पाड्यातील सर्वांना नम्र विनंती करण्यात येते की, आपण इतर हिंदी चित्रपटांना शंभर कोटींच्या वर गल्ला जमवून देतोय तर ह्या चित्रपटास का नाही ? म्हणून सर्वांनी स्वतः कुटुंबासह इष्टमित्र व आपल्या आजूबाजूच्या परिवारासह महात्मा फुले व सावित्रीमाई फुले दांम्पत्याच्या त्यागाचा जीवनपट पडद्यावर बघावा असे आव्हान श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे.