हरिगाव मतमाउली भक्तिस्थानात प्रथम ख्रिस्त शरीर संस्कार संपन्न
यावेळी प्रमुख याजक रे फा.डॉमनिक रोझारिओ यांनी प्रतिपादन केले की आज आपल्या हरिगाव धर्मग्रामासाठी खरोखर प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार हा हर्षाचा दिवस आहे. कारण या शुभप्रसंगी हरिगाव धर्मग्रामातील एकूण २७ मुले, मुली हे प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारणार आहेत. ख्रिस्ती धर्मातील प्रवेश विधीचा उच्चांक म्हणजे पवित्र ख्रिस्तशरीर होय.
प्रभू येशूच्या शरीर व रक्ताने सर जगाचे तारण झाले. प्रभू येशू ख्रिस्त स्वत: सार्वकालीन जीवनाची भाकर होऊन सर्व मानवजातीची भूक शमविण्यासाठी ह्या जगात आला आणि त्याच ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताच्या सेवनात आमच्या जीवनातील सर्व प्रकारची भूक भागविण्याचे सामर्थ्य आहे. ह्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. भाकरीच्या रुपात तो आमच्याकडे वस्ती करतो व आमच्याशी एकरूप होतो म्हणून हे साक्रामेंत सर्व साक्रामेंताचा रहस्यमय केंद्रबिंदू आहे. ख्रिस्तशरीर स्वीकारण्याची आमची आतुरता आज पूर्ण होत आहे. आमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा व तितकाच उल्हासाचा प्रभू येशूने आमच्या जीवनात येण्याने आमचे परिवर्तन होणार आहे यावर आमचा दृढ विश्वास आहे.
या प्रसंगी पालक, परिवार कोरोना नियम पाळून उपस्थित होते. शिल्पा वैजापूरकर यांनी आयोजन केले होते. ऑक्टोबर महिना हा माळेचा महिना असल्याने प्रत्येक शनिवारी भाविकांसाठी तपाचे आयोजन करण्यात आले आहे.