अहिल्यानगर

राहुरी तालुक्यात प्रथमच आयुर्वेदिक औषधाचे ट्राय हर्बल रेमिडीज या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न

राहुरी : तालुक्यात ट्राय हर्बल रेमिडीज या आयुर्वेदिक औषधाचे स्वतंत्र दालनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संंपन्न झाला. या नवीन दालनाचे उद्घाटन राहुरी नगर परिषदेच्या गटनेत्या डाँ.उषाताई तनपुरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, प्राचार्य डॉ.संभाजी पठारे,  बाळासाहेब निमसे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

    राहुरी शहरातील पत्रकार भाऊसाहेब येवले व त्यांचे चिरंजीव ऋषिकेश येवले यांच्या प्रयत्नातून ट्राय फार्म च्या यशानंतर त्यांनी राहुरी शहर वासियांना आयुर्वेदिक औषधांचा लाभ मिळावा या हेतूने राहुरी शहरांमध्ये ट्राय हर्बल आयुर्वेद या नावाने नवीन दालन सुरू केले. राहुरी पालिकेच्या गटनेत्या डॉ. ऊषाताई तनपुरे यावेळी म्हणाल्या,एम.फार्मसी हे उच्चशिक्षण घेतलेनंतर राहुरी सारख्या ग्रामीण भागात आर्युवेदीक औषधांचे दालन सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या सुविधेचा राहुरीकरांनी अवश्य लाभ घ्यावा.पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ म्हणाले, शहराऐवजी ग्रामीण भागात हे दालन सुरू करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. प्राचार्य डॉ. संभाजी पठारे म्हणाले, आर्युवेद ही जगाला भारताने दिलेली मोठी देणगी आहे. जगात आर्युवेदाचे महत्त्व सतत वाढते आहे. त्यामुळेच ऋषिकेश येवलेंच्या या निर्णयाला जनतेचे निश्चितच सहकार्य राहील.पतंजली समितीचे बाळासाहेब निमसे यांचेही यावेळी भाषण झाले.या प्रसंगी कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे , प्रा. पोपट जगदाळे, डॉ. समीर देशमुख ,जोगिंदरसिंग कथुरिया, सुरेश कोकाटे ,भाऊसाहेब साबळे, साहेबराव गाडे, आप्पासाहेब ढुस आदींसह अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्राय हर्बल आयुर्वेदीय औषधां बाबत बोलताना ट्राय हर्बल चे संचालक ऋषिकेश येवले यांनी अधिक माहिती दिली. यावेळी मान्यवरांचे स्वागत राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब येवले ,मीनाताई येवले स्वप्नाली ऋषिकेश येवले ,पत्रकार आकाश येवले, अक्षय येवले, आयुर्वेदिक रोपाांचे वाटप करून केले.

Related Articles

Back to top button