कृषी
21 दिवसीय प्रशिक्षणाचा कुलगुरुंनी घेतला आढावा
अहमदनगर/ जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि यंत्रे व शक्ती विभागाच्या वतीने 21 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षणाचा विषय कॉम्प्युटर एडेड डिझाईन ॲण्ड सीम्युलेशन हा आहे.
या प्रशिक्षणात पाच वेगवेगळ्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे प्रत्यक्ष हाताळणीद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरचा ॲटोमोबाईल, मेकॅनिकल तसेच कृषिच्या औद्योगिक क्षेत्रात वापर होत असून या प्रशिक्षणार्थींना संबंधीत उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रशिक्षणास कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट देवून प्रशिक्षणाचा आढावा घेतला.
यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या अमेरीकेतील एल ॲण्ड टी इंन्फोटेकचे संचालक इंजि. अतुल राणे उपस्थित होते. इंजि. राणे हे या सॉफ्टवेअर संबंधातच काम करत आहेत. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कृषि यंत्रे व शक्ति विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या प्रशिक्षणात 45 विद्यार्थी व पाच कर्मचार्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणुन डॉ. अवधुत वाळुंज हे काम पहात आहेत.