अहिल्यानगर

सौ.आरती उपाध्ये यांना रविवारी नवनिर्मितीच्या पाऊलखुणा सन्मान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या सचिव सौ. आरती गणेशानंद उपाध्येसह बारा महिलांचा स्त्री सन्मान केडगाव येथील दुर्वांकुर पंचकर्म आणि वंध्यत्व निवारण केंद्र आणि मीरा मेडिकल फाऊंडेशन, प्रणव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्मितीच्या पाऊलखुणा अंतर्गत मातृत्वाचा प्रेरणादायी सन्मान सोहळा रविवार दि. 01 ऑक्टोबर 2023 रोजी हॉस्पिटल सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक डॉ.प्रशांत महांडुळे व डॉ. सौ. शारदा निर्मळ, महांडुळे यांनी दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले, सरगम वाचक ग्रुपचे प्रा. नंदकिशोर कुऱ्हे, साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष पत्रकार स्वामीराज कुलथे आदी उपस्थित राहणार आहेत. नवरात्रीचा पावन महिमा स्त्री शक्तीचा उत्सव होय, हॆच औचित्य साधत हा स्त्री सन्मान होणार आहे. मातृत्वाचा प्रेरणादायी प्रवास केलेल्या दुर्गा मातांचा स्त्री सन्मान सोहळा आहे.

या सोहळ्यात सौ. प्रतिभा नितीन साबळे, सौ. शुभांगी मोनल पिसे, सौ. आरती गणेशानंद उपाध्ये, सौ.ज्योती राहूल चव्हाण, सौ.पूनम प्रवीण पाटील, सौ. मयुरी अविनाश आंग्रे, सौ. अक्षदा गणेश होळकर, सौ. मनीषा नामदेव कांबळे, सौ.स्नेहल प्रसाद वाघमारे, सौ.आरती सचिन राऊत, सौ. पूजा तुषार गोरे आणि सौ.निकिता नितीन बाणेकर आदींच्या होणाऱ्या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button