हिंदुस्तान कॅटल फिल्डस बारामती यांच्या वतीने खोकर विद्यालयात वह्या वाटप
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर येथे हिंदुस्तान कॅटल फिल्ड्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती यांच्या वतीने विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना वह्या देऊन सामाजिक संस्कारांचा आदर्श रुजवला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन पोपटराव जाधव यांनी भुषविले व प्रमुख अतिथी हिंदुस्तान कॅटल फिल्डचे धीरज बोरसे, डॉ. राहुल सलालकर, दिनकर सलालकर, दादासाहेब मुंढे, आकाश चव्हाण, विकास सलालकर, साईनाथ दूध संकलन केंद्राचे संचालक पृथ्वीराज उंद्रे, व खोकर सोसायटीचे संचालक बाबासाहेब पटारे, राजेंद्र पवार, कचरू पेरणे, नईम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एम व्ही खाजेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयातील सौ. एस.जे. राऊत, एस एन साळवे, एस व्ही कवडे, सौ. ए आर यादव, एच ए बोरुडे, सौ. बी खराडे, दीपक आदिक पानसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस .सी.फासाटे यांनी केले व आभार प्रदर्शन के. एस .कवडे यांनी मानले.