ठळक बातम्या
जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडाचा मनुष्यवधाचा गुन्हा शिकाऊ डाँक्टरवर
• शिकाऊ डाँक्टरवर जबाबदारी टाकता येत नसल्याने आरोग्य विभागाने निलंबन मागे घेतले.
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : अहमदनगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला होता. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.यात देवळाली प्रवराच्या कन्या डॉ.विशाखा शिंदे यांचाही समावेश आहे. डाँ.शिंदे या अस्थीरोग विभागात पदव्युत्तर पदविका करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. जिल्हा रुग्णालयातील कायम पदावर नेमणूकीस असणाऱ्या डाँक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ का केली.शिकाऊ डाँक्टरवर जबाबदारी टाकून गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे.
डॉ. शिंदे यांनी काय गुन्हा केला, असा सवाल विचारून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे की, देवळाली प्रवरा येथील रहिवासी डॉ. विशाखा शिंदे अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे अस्थीरोग विभागात पदव्युत्तर पदविका करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. आगीच्या कारणाचा शोध पोलीस यंत्रणा करत आहे. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. विशाखा त्या दिवशी या विभागात ड्युटीवर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा शिंदे यांना दोषी ठरवले गेले.खरंतर शिकाऊ डाँक्टरवर जबाबदारी देतात का? असा प्रश्न प्रथम तयार होतो. शिकाऊ डाँक्टर जबाबदार असेल तर जिल्हा रुग्णालयातील पा ते सहा अंकी पगार घेणाऱ्यांची जबाबदारी काय ? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.आयसीयु विभागाचे प्रमुख कोण शासनाच्या कायम सेवेत असणारे की शिकाऊ डाँक्टर, जळीतकांड मुळे शिकाऊ डाँक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे.प्रशासनाने शिकाऊ डाँक्टरचे नाव पुढे करुन मोकळे झाले.तर कायम सेवेत असणाऱ्या डाँक्टरवर गुन्हा दाखल का केला नाही.असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. डाँ.विशाखा शिंदे हिला आरोग्य विभागाने यांना निलंबित केले.निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली.
पोलीस प्रशासनाने डॉ. विशाखावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली. निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली.पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांची चुक लक्षात आली नाही का? जळीत कांडाच्या गुन्ह्यात शिकाऊ डाँक्टरला आरोपी करण्यात आले आहे.पोलिसांनी दबावाखाली गुन्हा दाखल केला का? डाँविशाखाचा बळी देवून मुख्य आरोपीस मोकळे ठेवण्याचा डाव आहे का?असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येणार आहे.पोलिस तपासात हि साधीशी गोष्ट लक्षात आली नाही का शिकाऊ डाँक्टरला जळीतकांडाचे जबाबदार कसे धरता येईल. पोलिसांनी जाणीव पुर्वक शिकाऊ डाँक्टरला जबाबदार धरले आहे.
पोलीस विभागाने मात्र डॉ.विशाखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि त्यामुळे त्यांच्या अडचणींत वाढ झाली. त्या आजतागायत कोठडीमध्ये आहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. शिकाऊ डाँक्टरची या घटनेमुळे उमेद ढासळणार आहे.तो पुन्हा वैद्यकिय श्रेञाकडे ढुंकुणही पाहणार नाही.त्यामुळे पोलिसांनी शिकाऊ डाँक्टरवर दाखल केलेला मनुष्यवधाचा गुन्हा मागे घेवून या विभागाचा कायम नेमणूकीस असणारा शासनाचा 4 ते 5 आंकी पगार घेणाऱ्या डाँक्टर विरोधात गुन्हा दाखल का केला जात नाही. या जळीतकांडाचा तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या कडे असुन त्यांच्या तपासात पुढे काय येते ते लवकरच समजणार आहे.