वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज -सरपंच राजु नेटके
पाथर्डी : क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय एसबीआय अहमदनगर व जय हिंद फौंडेशनच्या माध्यमातून कोल्हार येथील कोल्हुबाई माता गड पायथ्याशी 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज असल्याचे सरपंच राजु नेटके यांनी सांगितले.
भविष्यात कोल्हार येथील फळ वृक्षांमुळे पक्षी, प्राण्यांबरोबर मनुष्यालाही लाभ मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडिया व जय हिंद फौंडेशनच्या या उपक्रमामुळे गडाच्या वैभवात भर पडली आहे. या झाडांची काळजी जय हिंद फौंडेशनच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. नगर जिल्ह्यात या माध्यमातून होत असलेल्या वृक्ष लागवडीमुळे अहमदनगर क्षेत्रिय प्रबंधक कार्यालय स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे शिवाजीराजे पालवे यांनी सांगितले. बँकिंग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यातही बँकेचा हातभार लाभला आहे. बँकेने दिलेल्या आवळा, सीताफळ, चिंच, लिंब, करंज, जांभूळ या वृक्षांचे आम्ही संवर्धन करणार असल्याचे पालवे यांनी सांगितले. आभार मेजर भाऊसाहेब पालवे यांनी मानले.
यावेळी कोल्हार गावचे सरपंच राजु नेटके, जेष्ठ मार्गदर्शक महादेव पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, सदस्य संदिप पालवे, ईश्वर पालवे, किशोर पालवे, जय हिंदचे शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब पालवे, चंदु नेटके, सुनील डमाळे, अक्षय पालवे, विकास पालवे, शैलेश पालवे, मयूर गर्जे, मेजर अशोक जावळे, चंदू पालवे, जय भगवान महासंघाचे मदनशेठ पालवे, विजय पालवे, बाळासाहेब जावळे, रामदास देशमुख, बाबासाहेब जाधव, अशोक गर्जे, महादेव पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.