धार्मिक

गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामपूरात व्हावा – माजी सभापती पटारे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र सरला बेट येथील 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण आज श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सरला येथील पीठाधीश महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते श्रीक्षेत्र वैजापूर येथे पार पडले.

यावेळी श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे बोलताना म्हणाले की, २०२४ रोजी होणारा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज (१७७ वा ) अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामपूर तालुक्यात व्हावा अशी मागणी यावेळी गोदावरी धाम बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्याकडे केली आहे. नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला सदगुरू गंगागीरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह (१७७ वा) श्रीरामपूरात व्हावा ही अपेक्षा श्रीरामपूर तालुक्यातील सर्वच नागरिकांची आहे.

यापूर्वी देखील श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे सप्ताह होणार होता. मात्र कोरोना असल्याकारणाने प्रशासनाच्या नियमांचे बंधन असल्याने त्या ठिकाणी सप्ताह होऊ शकला नाही मात्र आता पुन्हा आपण कोरोनातून बाहेर पडलो आहे. त्यामुळे महाराजांनी श्रीरामपूर तालुक्यात पुढील वर्षी सप्ताह द्यावा अशी विनंती यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी केली.

यावेळी आ.रमेश बोरनारे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, भाऊसाहेब बांद्रे, तालुका उपाध्यक्ष डॉ. शंकरराव मुठे, मोहन वमने, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दत्ता जाधव, बेटाचे विश्वस्त बाबासाहेब चिडे, मधुकर महाराज आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button