अमृत महोत्सवी मतमाऊली यात्रापूर्व नोव्हेनास 1 जुलै पासून प्रारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगांव संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तीस्थान येथे मतमाऊली यात्रेचे अमृत महोत्सवी वर्ष असून यात्रापूर्व नोव्हेनास 1 जुलै पासून प्रारंभ होणार असून 9 शनिवारी नोव्हेनाची भक्ती आयोजित करण्यात आल्याची माहिती हरेगांव चर्च प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी दिली.
1 जुलै रोजी माळेचे रहस्य या विषयावर संत फ्रँसीस झेवीयर चर्च राहाता, नित्य सहाय्यक माता चर्च अशोकनगर येथील धर्मगुरू भक्ती प्रसंगी प्रवचन करतील. 8 जुलै -पवित्र मरियचे ध्येय, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो -निष्कलंक माता चर्च प्रवरानगर व बाळ येशू चर्च बाभळेश्वर, 15 जुलै -ख्रिसभेच्या सहभागात नित्य सहाय्य करणारी माता -ज्ञानमाऊली चर्च नेवासा व संत योसेफ चर्च केंदळ…
22 जुलै -देवाच्या योजनेतील पवित्र मारिया, लोयोला सदन चर्च श्रीरामपूर व संत फ्रँसीस झेवीयर चर्च टिळकनगर, 29 जुलै- आरोग्य दायीनी पवित्र मरिया, येशू सदन राहुरी व फातिमा माता चर्च राहुरी कारखाना, 5 ऑगस्ट -परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मरिया -डॉन बास्को चर्च सावेडी, संत जॉन चर्च भिंगार व संत अन्ना चर्च नगर, 12 ऑगस्ट -पवित्र मरिया संयमाची माता -ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव, सेक्रीड हार्ट चर्च सोनगाव…
19 ऑगस्ट -पवित्र मरिया निष्कलंक माता -संत मेरी चर्च संगमनेर, संत इंग्नाथी चर्च घुलेवाडी, संत योसेफ चर्च पानोडी, 26 ऑगस्ट नवव्या शनिवारी -पवित्र मरिया ईश्वर कृपेची माता या विषयावर होली फॅमिली चर्च कोपरगाव व रोझरी चर्च कोळपेवाडी येथील धर्मगुरू नोवेनात सहभागी होतील.
या सर्व शनिवारी होणाऱ्या भक्ती कार्यक्रमांस व अमृत महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, सचिन मुंतोडे, रिचर्ड अंतोनी, सर्व धर्मभगिनी, चर्च संलग्न सर्व संघटना, हरेगांव- उंदीरगाव ग्रामस्थांनी केले आहे.