पेन्शन धारकांचा प्रश्न अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार – खा. सुप्रियाताई सुळे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पेन्शन धारकांचा पेन्शन वाढ संदर्भातील प्रश्न या अधिवेशनात आक्रमकपणे मांडून जो पर्यंत पेन्शन धारकांचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी पेन्शन धारक नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे खा. सुप्रियाताई सुळे यांनी पेन्शन धारकांच्या महामेळाव्यात आश्वासन दिले आहे.
गुरूवार, दि. 8 जुन 2023 रोजी EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा पुणे जिल्ह्याच्या वतीने आंबेगाव पठार, कात्रज, पुणे येथे महामेळावा संपन्न झाला. यावेळी संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष विजय रेणुसे, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभाताई आरस, प. भारत महिला आघाडी सचिव सरिताताई नारखेडे, पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंह जाधव, मुख्य समन्वयक विलासराव पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष भानुदास नारखेडे, छत्तीसगड राजनंदगावचे समन्वयक एजाज उर रहेमान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी सांगितले की, केंद्र सरकारने या पावसाळी अधिवेशनात आमच्या पेन्शन धारक नागरिकांचा प्रश्न सोडविला नाही तर आम्ही देशभर रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेणार आहोत. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी काळभोर यांनी केले. प्रास्ताविक सी.एम राऊत यांनी केले तर आभार विजय राजपाठक यांनी मानले.
या प्रसंगी महाराष्ट्र सचिव सुधीर चांडगे, पुणे जि.अध्यक्ष सतिश शिंदे, जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे, पिंपरी – चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष विजय जगताप, समन्वयक पुणे अजित घाडगे, कार्यकारी सदस्य शिवशंकर कलोरे, जगन्नाथ मछले, पुणे म.न.पा.चे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे व परिसरातील नगरसेवक तसेच पुणे जिल्ह्यातील व पिंपरी – चिंचवड, मावळ, खेड, मुळशी, जुन्नर, नारायणगाव, आंबेगाव, दौंड, बारामती, सांगली, सातारा, संभाजीनगर अशा विविध ठिकाणांहून EPS-95 संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच पेन्शन धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.