साहित्य व संस्कृती

संतकवी एकनाथ डांगे पाटील यांचे ‘भक्तिदीप’ संस्कारी कवितासंग्रह – बाबासाहेब चेडे

श्रीरामपूर : खंडाळा येथील संतकवी एकनाथ डांगे पाटील यांनी लिहिलेला ‘भक्तिदीप’ कवितासंग्रह संस्कारी असल्याचे मत पत्रकार आणि भूमी फौंडेशन सेवाभावी संस्थेचे सदस्य बाबासाहेब चेडे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील श्रीराम मंदिरात खंडाळा येथील संतकवी एकनाथ डांगे पाटील यांच्या ‘भक्तिदीप’ कवितासंग्रह हस्तलिखिताचे श्रीराम चरणी अर्पण प्रसंगी बाबासाहेब चेडे बोलत होते.

कवी डांगे पाटील यांनी आपल्या कवितासंग्रहाचे महत्त्व सांगून स्वागत केले. यावेळी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये आणि कवयित्री संगीता फासाटे यांनी भक्तिदीप कवितासंग्रहाचे व कवीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कवी डांगे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button