धार्मिक
गोदावरी धाम सराला बेट येथे भव्य बाल संस्कार शिबीर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान, गोदावरी धाम बेट सराला येथे दि १ ते २२ मे २०२३ पर्यंत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरू ब्रम्हलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज पीठाधीश सरला बेट यांचे आशीर्वादाने भव्य बाल संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात नित्य प्रार्थना, सद्गुरू दर्शन पाठ, गायन क्लास, गीतापाठ पाठांतर, खेळ आदी कार्यक्रम होतील. या शिबीराचे शुल्क ३१०० रुपये राहील. तरी आपल्या पाल्याचा प्रवेश २५ एप्रिल पर्यंत नोंदवावा. शिबिराची सांगता २२ मे रोजी होणार आहे. प्रवेशासाठी विक्रम महाराज- ९५४५०१०९७१, संतोष महाराज- ९०११६५१८३०, मधुकर महाराज- ९६७३१५०१००, योगानंद महाराज- ७०३०५०२०२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.