शिक्षणवारी ज्ञान पंढरी

संच मान्यतेसाठी विद्यार्थी संख्येची अट शिथील करा-डॉ किशोर डोंगरे

अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण संचालक द.गो.जगताप यांना निवेदन 

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन संच मान्यता करत असताना दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी भागात विद्यार्थी संख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कार्यभाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. संचमान्यता करत असताना ग्रामीण भागात माध्यमिक संलग्न उच्च माध्यमिक तुकडीसाठी विद्यार्थी संख्या ४० करावी व शहरी भागात वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी ८० विद्यार्थी संख्या तुकडी असावी, अशा विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांना अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर डोंगरे व सरचिटणीस महेश पाडेकर यांनी निवेदन दिले.

शिक्षक भारती संघटनेच्या मागण्यांमध्ये आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांचा २२०१ लेखाशीर्ष पगार नियमित होत नाही. त्यांचे पगार प्लॅन मधून नॉन प्लॅन मध्ये करावे, शालार्थ आय.डी., ७ वा वेतन आयोग फरक हप्ता डिसेंबर पर्यंत मिळावा, अर्धवेळ तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे पगार संच मान्यता होईपर्यंत काढावे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण, ७ वा वेतन आयोग वेतन निश्चिती माध्यमिक विभागाप्रमाणे ऑनलाइन संच मान्यता व ऑनलाइन वैयक्तिक मान्यता द्याव्यात, पी.एफ. पावत्या हिशोब, एन.पी.एस. हिशोब, संच मान्यता १९-२० काही शाळांना अद्याप मिळालेल्या नाही, फरक व वैद्यकीय बीले, महिन्याच्या एक तारखेला पगार द्यावा अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे देऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक द.गो. जगताप यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

कोविड -१९ नियमामुळे जास्त गर्दी न करता प्रातिनिधिक स्वरूपात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर डोंगरे व सरचिटणीस महेश पाडेकर यांनी निवेदन दिले. या निवेदनास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर.बी.पाटील, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, माध्यमिक सोसायटीचे संचालक कैलास राहणे, विनाअनुदान विरोधी समितीच्या महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे, संदीप वर्पे, मफीज इनामदार, सचिन लगड, महिला तालुकाध्यक्ष रूपाली बोरुडे, संजय तमनर, श्याम जगताप, हर्षल खंडीझोड, दिनेश शेळके, प्रवीण मते, गोवर्धन रोडे, संजय भुसारी, ज्ञानेश्वर काळे, संभाजी पवार, संजय पवार, सोमनाथ बोनंतले, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सुर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम पी शिर्के, हनुमंत बोरुडे, सोमनाथ बोंतले, प्रकाश मिंड, मधुकर नागवडे, महादेव कोठारे, संतोष देशमुख, योगेश कराळे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, काशीनाथ मते व सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदींनी पाठिंबा दिला.

Related Articles

Back to top button