छत्रपती संभाजीनगर

बाळासाहेब ठाकरे गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

पैठण तालुका शिक्षक सेनेचा अभिनव उपक्रम

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या तब्बल ८९ गुणवंत पाल्यांना बाळासाहेब ठाकरे गुणवंत पाल्य पुरस्कार राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाल्यांनी शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य संपादन केल्याबद्दल शिक्षक सेनेच्या पैठण तालुका शाखेने राज्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षकांच्या व पाल्यांच्या प्रचंड मोठ्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी आमदार संदिपान भुमरे यांनी यशवंत पाटील यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक प्रवास शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात मागणी लावून धरणार असल्याची ग्वाही भुमरे यांनी दिली.अंबादास दानवे यांनीही शिक्षकांच्या हाती शिक्षणाची दोरी असल्याने जगाचा उद्धार तर होतोच, परंतु आपल्याही पाल्याचेही कौतुक शिक्षक सेनेच्या माध्यमातून होत असल्याच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद पा. बोंबले, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदूअण्णा काळे, नाथ संस्थान विश्वस्त दादा पाटील बारे, पंचायत समिती सभापती अशोक भवर, उपसभापती कृष्णा भुमरे, मा. राज्य सरचिटणीस पद्माकर इंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णा भाऊ लबडे, शहरप्रमुख तुषार पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, जि.प.निमंत्रित सदस्य प्रभाकर पवार, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, प्रादेशिक सचिव विठ्ठल बदर, गंगापूर शिक्षक पतसंस्था चेअरमन सुनील जाधव ,युवा सेना जिल्हा अधिकारी किशोर चौधरी, महिला आघाडी जिल्हा संघटक राखीताई परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम पाटील एरंडे,तालुका युवा अधिकारी विकास पा.गोर्डे,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, माजी नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, नगरसेवक भूषण कावसानकर, नगरसेवक कृष्णा मापारी, उपतालुकप्रमुख मनोज पेरे,अलकाताई पोटे, खुशालसिंग भवरे, अजय परळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप ढाकणे यांनी केले.प्रास्ताविक शिक्षक सेना तालुकाप्रमुख अमोल एरंडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी तालुकाप्रमुख अमोल एरंडे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख महेश लबडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दुधे, देविदास फुंदे, संघटक मोहन घरगणे, सरचिटणीस कैलास मिसाळ, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, कोषाध्यक्ष लक्ष्मण गलांडे, प्रसिद्धिप्रमुख पांडुरंग गोर्डे, अजिनाथ दहिफळे, श्रीकांत कराड, युनूस शेख, श्रीकांत गमे, किशोर तोतरे, गहिनीनाथ वीर, याकूब पठाण, वैभव खेडकर, संदीप निवारे, बाप्पासाहेब वाघ, हनुमंत दराडे, गजानन नेहाले, रामभाऊ हंडाळ, अरुण फड, जालिंदर पंजावले, संदीपान बेडदे, संदीप घनवट, राहुल गिरगे, सिराज पठाण, वैजीनाथ राठोड, ईश्वर खंदारे, प्रवीण फटांगडे, मनोज अंधारे, अंबादास बोराडे, हरीश बुळे, ज्ञानेश्वर गोसावी, रामेश्वर माने , सुरेश पाटील, बाबासाहेब तांदळे, जालिंदर निमसे, गणेश घोरपडे, हणमंत पंदे, आदींनी मेहनत घेतली.

कार्यप्रभावाने शिक्षक सेनेत अनेकांचा प्रवेश!

शिक्षण व शिक्षक हितासाठी सदैव कार्यरत शिक्षक सेनेच्या कार्यप्रभावाने शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन शौकत पठाण, माजी सचिव एकनाथ नरके, आप्पासाहेब थोरात, संतोष केकते, संभाजीराव कर्डिले,माणिक नल्लेवाड, अमर हनवते, आयुब शेख, धोंडीभाऊ सुखदेव, महादेव कागदे,अजिनाथ गीते, नागनाथ मिटकरी, भागवत बडे, सुभाष शिंदे, सुधीर शिंदे, राजेश पाखरे, अनिल गणराज यांच्यासह माध्यमिक शिक्षक भारतीतून प्रमुल पाटील, शिवराज मोहिते, गणपत मिटकर, संतोष सरोदे, कृष्णा शिंदे, खंडागळे अशा अनेक ज्येष्ठ शिक्षकांनी जाहीर प्रवेश घेतला.

 

महिला आघाडीची स्थापना

महिला शिक्षिकांचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने यावेळी महिला आघाडीची स्थापना करण्यात आली. सुनिता दरे यांची अध्यक्षपदी, भाग्यश्री मुरकुटे यांची सरचिटणीसपदी, स्वाती डाके यांची कार्याध्यक्षपदी, अर्चना संकपाळ यांची कोषाध्यक्षपदी, सुनीता पवार यांची प्रसिद्धीप्रमुख पदी , तर माया गुगळे यांची उपाध्यक्षपदी रोहयोमंत्री भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button