अहिल्यानगर

वारकरी संप्रदाय हा भक्ती, ज्ञान, वैराग्याचा समन्वय – महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज

राहुरी | बाळकृष्ण भोसले – राहाता तालुक्यातील लोहगाव येथील श्री साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल संस्थेचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या संस्थेच्या वतीने विद्यार्थी घडविण्याबरोबरच ज्ञानदानाचे कार्य येथे होणार आहेे. वारकरी संप्रदाय हा भक्ती ज्ञान वैराग्याचा समन्वय आहे. मनुष्याचे मन, इंद्रिय फार अचपळ आहेे. त्याला स्थिर करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे, असा उपदेशपर संदेश महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना प्रसंगी दिला.
राहता तालुक्यातील लोहगाव येथील श्री सद्गुरु गंगागिरी गुरुकुल भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, साई निर्माण ग्रुप शिर्डीचे विजुभाऊ कोते, जिल्हा परिषद सदस्य तळेगाव गट महिंद्र गोडगे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग, माजी उपसभापती पंचायत समिती राहाता बबलू उर्फ बाबासाहेब म्हस्के, लोहगावच्या सरपंच सौ स्मिताताई चेचरे, लोहगाव सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरेे आदी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, तरुण पिढीला घडवण्याचे संस्कार केंद्र या ठिकाणी सुरू झालेले आहे तरुण वर्गाने इतरत्र भरकट न जाता या ठिकाणी येऊन ज्ञान घ्यावे. त्यामुळे या गुरुकुलाचा फायदा या परिसरातील तरुण वर्गाला निश्चितपणे होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मगर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना मंत्रमुग्ध केलेे.
सकाळ पासूनच या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळी व गावातील सर्व तरुण व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत होते. सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विखे पाटील कारखान्याचे माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा यावेळी संपन्न झाला. गुरुकुल संस्थांचे अध्यक्ष संदीप महाराज व श्री पोकळे महाराज यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केलेे. कार्यक्रमासाठी लोहगाव पंचक्रोशीतील त्याचबरोबर लोहारे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button