अहिल्यानगर
कवयित्री संगीता फासाटे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय माध्यमिक विभागाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार कवयित्री संगीता फासाटे कटारे यांना कुटुंबासह सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सन 2003 पासून खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत स्कॉलरशिप, नवोदय, विविध सहशालेय उपक्रम, आणि इतरही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असतात. स्वर्गीय सौ कमालिनी बाळासाहेब सातभाई शासनमान्य सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय कोपरगाव यांच्या वतीने दिला जाणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दिनांक 11 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. संस्थेच्या विविध विभागाच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प.पु.प. महंत राजधर बाबा महानुभाव संवत्सर, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक चेअरमन, डॉ. हिरालाल महानुभाव, साई पॉली क्लिनिक अँड इंडॉस्कॉपी सेंटरचे डॉ. राजेश माळी, नेत्ररोग तज्ञ डॉ. सचिन उंडे, निमा कोपरगाव शाखा अध्यक्ष डॉ. जितेंद्र रणदिवे, आनंद क्लिनिकचे डॉ. सतीश लोढा, सुप्रसिद्ध विधीज्ञ भरत सातव, पीपल्स बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुनीलशेठ बोरा, कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेेख आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा शिर्डी संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक, खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव अविनाश आदिक, सहसचिव जयंत चौधरी, गव्हर्निंग सदस्य भाऊसाहेब लवांडे, हंसराज आदिक, नितिन पवार, सुनिल थोरात, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.बाबुराव उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, बाबासाहेब चेडे, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.