अहिल्यानगर
सह्याद्री ट्रेकर्सच्यावतीने किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण
आंबी : श्रीरामपूर येथील सह्याद्री ट्रेकर्स आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा थत्ते ग्राऊंड जवळील शिवबा सभागृहात पार पडला. एल.आय.सी. चे विकास अधिकारी विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
किल्ले बनवा स्पर्धेत ५० चिमूकल्यानी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत श्रीपाद गोऱ्हे प्रथम, नितीन गवारे द्वितीय, आयुष कुऱ्हे तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंतांचा रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून सचिन भांड, सचिन चंदन, उमेश शिंदे यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री ट्रेकर्सचे सचिन भांड, सचिन चंदन, डॉ. रविंद्र महाडिक, उमेश शिंदे, गणेश खैरनार, अभिजित गोसावी, सुधीर कोहली, किरण पाळंदे, कृष्णा शेजवळ, मयुर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचलन श्रीमती जोंधळे यांनी केले.